Thursday, June 30, 2011

मेरा भारत महान.

माझा भारत महान का आहे?
कारण माझ्या आजच्या भारतात लहानांसाठी काहीच नाही.
जे काही आहे आणि जे काही होऊ पाहते आहे त्यात आपण लहान माणसे कोठे बसतो?
मनमोहन सिंग साहेब आपल्या बद्दल खूप आदर पूर्वी वाटत असे'
मे या वेळेस कधी नव्हे ते कोंग्रेस ला माझे मत दिले
म्हटल माणूस भला आहे. पण नुसतेच भले असुन चालत नाही
तर तो कार्यक्षम देखील असावा लागतो
त्याचा दरारा सर्वत्र हवा

आजची भारताची अवस्था काय आहे?
आपणास खरच वाटते का की आपले सरकार आम आदमी साठी आहे?
मला तर वाटते की आपले सरकार फक्त महागडे हापूस आम खाणारे लोकांसाठी आहे.

आपल्या राजवटीमध्ये काय झाले ते पहा .
अन्न धान्य महाग .
घरांच्या किमती तर अशा की सामान्य माणसाने फक्त स्वप्नात घर पहावे.
आज गरीब सामान्य माणूस आपल्या मुलाला १२ वी पर्यंत तरी शिकवू शकतो का?
प्रवास महाग
औषधे व वैद्यकीय सेवा माणसाचे कंबरडे मोडणाऱ्या.
स्वस्त काय
मोबईल ,
एल सी डी टीवी.
मोटार सायकल
सी डी प्लेअर
वीडीओ प्लेअर
या वस्तू आपण , सोनिया किवा राहुल खाऊ शकता का?

काय केले आपण गरिबांसाठी ?
अरे जगण्याच्या  लायकीचे नाही ठेवलेत त्यांना.

का नाही वाढणार  गुन्हेगारी
घरात खाणारी तोंडे भरपूर व हाताला काही कामच नाही.
अशा वेळेस मुलांनी काय करावे ?
काम नाहीच मिळाले तर चोरी करावी
मुलीना काम नाही मिळाले तर त्यांनी
अनैतिक कामे करून कुटुंबाचे पोट भरावे?

म्हणे आपला भारत महासत्ता होणार आहे ?
देशातील १२० कोटी लोंकापैकी १०० कोटी लोकांना उपाशी ठेऊन
आपला भारत महासत्ता होईल असे स्वप्न फक्त कॉग्रेस लाच पडू शकते.

अमेरिका म्हणते भारत उद्याची महासत्ता आहे म्हणून हवेत उडू नका
तुम्हाला मुर्ख बनवत आहे ती.

कारण तुम्ही स्वप्नात गेलात की त्यांचे काम फत्ते.
अरे जागे व्हा अजून वेळ गेलेली नाही.

माझा भारत फक्त आकार व लोकासंखेने महान आहे.
माझ्या भारतात मोठ्या लोकांना विशेष मान आहे.
माझ्या भारतात घोटाळे बाज लोकांना खास सुविधा प्राप्त होतात.
अजमल कसाब सारखे अतिरेकी विशेष सुराक्षेत जगतात.
अब्जावधी रुपयांचे घोटाळे करणारे वक्ती सेलेब्रिटी होतात.

माझ्या देशात शिक्षण सम्राट आहेत.
,,          ,,        साखर  ,,        ,,,,

माझा देश बुवा बाबा आणि बापूंचा देश आहे.
बुवा आणि बापूंची कोरोडॉ ची मालमत्ता आहे.
काला पैसा स्वीस बँकेत जमा आहे.
आणि सामान्य माणूस कंगाल आहे.
आम्ही चमत्कारला नमस्कार करणारी माणसे आहोत.

आगे बढो हात के पंजे हम तुम्हारे साथ हे.



.